इगतपुरीत घाटनदेवी मंदिरासमोर पिकअपच्या धडकेत भाविक ठार
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या इगतपुरी जवळील घाटनदेवी मंदिरासमोर असलेल्या पूजा साहित्य विक्रीच्या दुकानाला मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या भरधाव पिकअपने (एमएच ०४ केएफ ८६४८) शनिवारी दुपारच्या सुमारास धडक दिली.
या अपघातात मंदिरासमोर उभे असलेले देवीची सेवा करणारे भाविक भेडासिंग (६५, रा. तळेगाव, इगतपुरी) यांचा मृत्यू झाला.
वाहनचालकासह त्याचा सहायक जखमी झाला आहे. भेडासिंग यांच्या अपघाती मृत्यूनंतर हळहळ व्यक्त होत आहे.
घाटनदेवी मंदिरात दर्शन करण्यासाठी होणारी प्रचंड गर्दी पाहता नवरात्रात मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावण्यात आले होते. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप बॅरिकेड्स तोडून दुकानात घुसली. नशीब बलवत्तर म्हणून दुकानदाराची तीन मुले दुकानाबाहेर खेळत असल्यामुळे अपघातातून वाचली. या अपघातात दुकानदाराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जखमींना उपचारासाठी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश शिरोळे यांनी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
“मॅम, फ्रेंडशिप करणार का”, Whatsappवर महिलेकडे फ्रेंडशिपची मागणी करणाऱ्यावर गुन्हा
विनापरवानगी होर्डिंग्ज; आदेशाला केराची टोपली; पाहणीत आढळले विनापरवानगी होर्डींग्ज