नाशिक: कुरापत काढून कार लुटणारे जेरबंद; सीसीटीव्हीच्या आधारे लागला लुटारूंचा शोध !

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर भागात रीक्षाला कट मारल्याच्या कारणावरून कुरापत काढून अनोळखी चौघांच्या टोळक्याने शनिवारी (दि.६) मध्यरात्री २ वाजेच्या हर्षल पारोळकर यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांची चारचाकी (एमएमच १५ एफटी ७१७६) लुटल्याची घटना घडली होती.

ही कार लुटणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकाला यश आले असून पोलिसांनी संशितांपैकी तिघांना वडाळा गावातून अटक केली आहे.

नाशिक: मित्रांसोबत सहलीसाठी गेला, टेंटमध्ये राहिला; सकाळी आंघोळीसाठी गेला आणि आक्रित घडलं

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

पोलिसांनी कार लुटणाऱ्या संशयित युनिस उर्फ अण्णा आयुब शहा (२४, म्हाडा कॉलनी, वडाळा),वशीम बसीर सैयद ( ४१, रा. संजेरीमार्ग वडाळा) , गुलाम सादीक मोंढे(२७, रा. वज्रेश्वरी मंदिराजवळ वडाळा) यांना नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनीट एकच्या पथकातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, सहायक पोलिस उपनिरीक्षक रविंद्र बागूल पोलिस हवालदार प्रविण वाघमारे, विशाल देवरे, मुख्तार शेख, आप्पा पानवळ यांनी गुन्हा दाखल होताच परिसरातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारे शोध घेऊन अटक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

क्रिप्टो करन्सीच्या आमिषाने नाशिकमध्ये तब्बल चार कोटींची फसवणूक

पोलिसांनी त्यांच्याकडून पाळेकर यांचे लुटलेले घड्याळ, मोबाईल, पांढरी अंगठी व साडेचार हजार रुपयांची रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली रीक्षा ( एमएच१५, झेड ९८४७ एसा एकूण ९६ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.”

संशयित पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्हीत कैद:

इंदिरानगर बोगदा परिसरातील जॉगिंग ट्रॅकच्या बाजूला संत सावतामाळी साईनाथ चौफुलीजवळ रिक्षाला कट मारल्याची कुरापत काढून कार लुटणारे संशयित विल्होळीच्या दिशेने गेल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवून या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एका पेट्रोल पंपावर ते पोलिसांना दिसून आले.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी गुप्तहेरांच्या माध्यमातून संशयितांचा माग काढून त्यांच्या मुसक्या आवळल्या असून अजून एका संशयितांचा शोध सुरु आहे.

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790