आनंददायक: नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच.. या महिन्यात होणार चाचणी !

आनंददायक: नाशिक-कल्याण मेमू लोकल लवकरच.. या महिन्यात होणार चाचणी !

नाशिक (प्रतिनिधी): अनेक दिवसांपासून नाशिककरांची मागणी असणारी नाशिक ते कल्याण लोकल सेवेची चाचणी येत्या डिसेंबर महिन्यात घेण्यात येणार आहे.

यामुळे कनेक्टिव्हीटीला चालना मिळणार असून नाशिक ते कल्याणपर्यंत असणारी सर्व स्थानके या लोकलमुळे कनेक्ट होणार आहेत.

यामुळे विद्यार्थी, शेतकरी, प्रवासी सामान्य नागरिक नोकरदार यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक: कार व कंटेनरच्या भीषण अपघातात नाशिकच्या ५ युवकांचा मृत्यू

नाशिक-कल्याण मेमू (मेन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पझ युनिट) लोकलसेवेला यापूर्वीच मान्यता मिळाली आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या नावाखाली ही मागणी बासनात गुंडाळण्यात आली. त्यानंतर ही निवडणूक झाल्यानंतर नव्या वंदे मातरम् मेमू लोकलची चर्चा सुरू झाली. यात दिवसांमागून दिवस उलटत गेले. मात्र, नाशिकसाठी अतिशय महत्त्वाची असणारी मेमू लोकल काही सुरू झाली नाही. पुन्हा कालांतराने मेमू लोकलच सुरू होईल, अशी घोषणा रेल्वेने केली.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; मनमाडला गारांचा पाऊस

नाशिक-कल्याण लोकसाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले. त्यांनी लोकसभेत ही मागणी लावून धरली. त्यानंतर ही लोकल कुर्ला कारशेड येथे नेऊन ठेवण्यात आली होती. तिची अंतर्गत रचना दुरुस्त करण्यात आली. तिचे रूपडे बदलण्यासाठी ३२ कोटींचा खर्च करण्यात आला. या लोकलच्या चाचणीसाठीही ९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. आता डिसेंबरमध्ये तरी या चाचणीला मुहूर्त लागेल अशी अपेक्षा आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
Breaking News: दक्षिण आफ्रिकेतून दोन जण नाशिकला परतले… जाणून घ्या सविस्तर…

हे ही वाचा:  Breaking: निफाड परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790