आंतरराष्ट्रीय गणिततज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे निधन….

नाशिक (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय गणिततज्ञ दिलीप गोटखिंडीकर यांचे आज (दि.२९) वयाच्या ७० व्या वर्षी हृदयविकाराने नाशिक येथे निधन झाले.

दिलीप गोटखिंडीकर हे नाशिकमधील पेठे विद्यालयामध्ये शिक्षक होते. भास्कराचार्य गणितनगरीच्या उभारणीमध्ये त्यांनी संयोजक म्हणून जबाबदारी पार पाडली होती. मराठी भाषा संचालनालय सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले. त्याचबरोबर अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी संशोधन प्रबंधसुद्धा सादर केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

हे ही वाचा:  लोकसभा निवडणुकीत उमेदवार व राजकीय पक्ष यांच्या खर्चावर राहणार निवडणूक आयोगाची नजर

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790