अपघात झाला, आता पोलिसच फिर्याद दाखल करणार; नाशिक शहर पोलीस आयुक्तांचा निर्णय

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात अपघाताच्या घटना रोजच घडत आहेत. कधी दुचाकीस्वार तर कधी चार चाकी वाहनांमुळे अनेकदा अपघात होतात. मात्र अनेकवेळा दोन्ही पक्षाकडून त्यांची बाजू लावून धरली जाते.

यामुळे अपघात नेमका कसा झाला किंवा कुणाच्या चुकीमुळे झाला हे लक्षात येत नाही. यावर नाशिक पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला असून आता यापुढे नाशिक शहरातील अपघाताच्या घटनांत स्वतः पोलिसच फिर्यादी असणार आहेत.

नाशिक शहरात दिवसेंदिवस अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असून या घटनांची नोंद संबंधित पोलीस स्टेशनला केली जाते. मात्र अनेकदा योग्य माहिती न मिळाल्याने तपास संथगतीने होत असतो. यावर उपाय म्हणून आत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत होणाऱ्या सर्वच मोटार व रस्ते अपघातांच्या प्रकरणात आता पोलीसच फिर्यादी असणार आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

यात प्राथमिक चौकशी पासून गुन्हा दाखल करण्यासाठी लागणारे फिर्याद पोलीस दाखल करणार आहेत. अनेक अपघातात जखमींच्या नातेवाईकांना फिर्याद फिर्यादी केले जात असल्याचे निरीक्षण पोलीस आयुक्तांनी नोंदवून तपासासह गुन्हे नोंदी बाबत आदेश दिले आहेत.

राज्यात अपघात प्रकरणी पोलिसांतर्फे फिर्याद दिली जात असताना नाशिक शहरात मात्र ही प्रक्रिया लागू नसल्याचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आयुक्तांनी हे आदेश काढून तात्काळ अंमलबजावणीच्या सूचना केल्या आहेत. त्यातून योग्य गुन्ह्यांच्या नोंदीसह दोषारोपसिद्धीला मूर्त स्वरूप येणार आहे. शहरात दाखल होणाऱ्या फेटल व मोटार अपघातांमध्ये जखमीच्या नातेवाईकांना फिर्यादी केले जाते, हे सुसंगत नसल्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे निरीक्षण आहे. अपघाताची प्राथमिक चौकशी प्रशिक्षित पोलीस म्हणून अंमलदार करतात किंवा अधिकारी करतात.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

अपघात कसा झाला, याची माहिती वाहतुकीचे नियम वाहन कायदा याची संपूर्ण माहिती सर्वसामान्यांपेक्षा पोलिसांना अधिक असते. त्यासाठी अपघाताची प्राथमिक चौकशी पोलिसातर्फे करण्यात येते. तर चौकशीची संबंध नसलेल्या व्यक्तीला फिर्यादी केल्यास दोषारोपसिद्धी दरम्यान अडचण निर्माण होते. त्यामुळे यापुढे शहरात प्रत्येक अपघाताच्या गुन्हा तपासणीसाठी पोलीस स्वतःहून फिर्याद देतील. यासंदर्भात स्पष्ट आदेश पोलीस आयुक्तांनी निर्गमित केले असून सर्व पोलीस ठाण्यांमधून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

पोलीस आयुक्तांच्या निरीक्षणात काय आलं?:
दरम्यान कोणत्याही अपघातांची चौकशी पोलिसातर्फे होते. कारण पोलिसाना वाहतुकीचे नियम, अपघाताचे कारण, स्थिती व इतर ज्ञान अधिक असते. त्या संदर्भात प्रशिक्षण दिलेले असते सर्वत्र पोलिसांनीच फिर्याद देण्याची पद्धत आहे त्यानुसार नाशिक आयुक्तालयातही त्याची अंमलबजावणी तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान सामान्य फिर्यादी असल्यास अपघाता संदर्भात योग्य माहिती देईलच, असे होत नाही. शिवाय फिर्याद ही जखमी व्यक्ती नातेवाईक स्वतःच्या बाजूनेच नोंदवत असल्याचे निदर्शनास आले आहे. फिर्यादीत तथ्य अपेक्षित त्यासाठी पोलीस चौकशीचा आधार महत्त्वाचा असतो.  सर्वसामान्य फिर्यादी न्यायालयीन प्रक्रियेत पुरेसे सहकार्य करतातच असे नाही. न्यायप्रक्रिया सर्वसामान्य फिर्यादी साक्षीदार जबाब पालटण्याची शक्यता असते, असे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सोन्याचं मंगळसूत्र केलं परत; महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा !

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790