…अन्यथा 1 नोव्हेंबरपासून टोल भरणे बंद… आ. छगन भुजबळ यांचा इशारा

…अन्यथा 1 नोव्हेंबरपासून टोल भरणे बंद… आ. छगन भुजबळ यांचा इशारा

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याची डागडुजी व सुधारणा 31 ऑक्टोबरपर्यंत झाली नाही, तर एक नोव्हेंबरपासून टोल भरणे बंद केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री आ. छगन भुजबळ यांनी दिला आहे.

आ. छगन भुजबळ यांनी बुधवारी सकाळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांसोबत मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली यावेळी त्यांनी नाशिक-मुंबई महामार्गावर जे खड्डे पडले आहेत, त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रत्यक्ष अधिकार्‍यांना या खड्ड्यांमुळे कसा त्रास होतो, याची डोळ्यांसमोर असलेली उदाहरणे दाखवून दिली. यानंतर अधिकार्‍यांना खडे बोल सुनावताना आ. छगन भुजबळ यांनी सांगितले, की जर अशा पद्धतीप्रमाणे रस्त्याची कामे होणार असतील, तर नागरिकांनी टोल कशासाठी द्यावा? असा प्रश्‍न उपस्थित केला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत छगन भुजबळ यांनी आज सकाळीच नाशिक-मुंबई महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली. फारसे खड्डे नसल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून केला जात होता.

मात्र, भुजबळांनी महामार्ग प्राधिकरणाच्याअधिकाऱ्यांना नाशिक मुंबई महामार्गावरील खड्डे दाखवून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. खड्ड्यांमुळेच गंभीर अपघात होत असल्याची बाबही भुजबळांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. शिवाय खड्ड्यांमुळे वेळ, पैसा, इंधन यांच्या अपव्ययाबरोबरच जिवीत हानी होत आहे. प्राधिकरणाच्यावतीने संबंधित कंत्राटदाराकडून कामे करुन घेत नसल्याने भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता याप्रश्नी ११ दिवसांची मुदत खड्डे बुजविण्यास देण्यात आली आहे. दिवाळीच्या तोंडावर हे सर्व खड्डे बुजवावेत जेणेकरुन गावी जाणाऱ्या किंवा येणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास होणार नाही. हे काम पूर्ण झाले नाही तर १ नोव्हेंबरपासून या महामार्गावरील सर्व टोल बंद पाडण्यात येतील, असा इशाराच भुजबळांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

याबाबत तातडीने कारवाई करावी, असे आदेशदेखील त्यांनी महामार्ग प्राधिकरणाला दिले असून, जर दि. 31 ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई महामार्ग मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे डांबरीकरण केले गेले नाही, तर दि. 1 नोव्हेंबरनंतर टोल भरणे बंद केले जाईल, असा इशारा आ. छगन भुजबळ यांनी दिला आहे. आ. छगन भुजबळ यांच्या या इशार्‍यामुळे नागरिकांना आता थोडासा दिलासा मिळण्याची शक्यता तदेखील व्यक्‍त केली जात आहे.

मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना याबाबत पत्र व्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत त्यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group