अंबड परिसरातील औद्योगिक वसाहतीत आज (9 जानेवारी) वीजपुरवठा राहणार बंद !

नाशिक (प्रतिनिधी) : दुरुस्तीच्या कामामुळे तसेच ३३ केव्ही वीजवाहिनीचे स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यामुळे आज शनिवारी (दि.९ जानेवारी) रोजी शहरातील अंबडमधील औद्योगिक वसाहतीमध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.

महावितरणकडून अंबडमधील ३३ केव्हीच्या ३ फिडरचे काम करण्यात येणार आहे. म्हणून, सकाळी ८ वाजेपासून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यानुसार, जी, जे, एफ सेक्टर, डब्ल्यू सेक्टरमधील प्लॉट क्रमांक ११२ ते १५६, इ सेक्टरमधील प्लॉट क्रमांक ६८, ६९,७४,९५ ते इ १०५, इ ७ ते इ १३, एच सेक्टरमधील प्लॉट क्रमांक १०५ ते १०७, एच सेक्टरमधील २३/१ ते एच २३/३, गंगामाई कॉम्प्लेक्स, इपीसी, पीएपी ४ ते ४१, सिमेन्स, इनोव्हा रबर, किर्लोस्कर, सीटीआरजवळील पीएपी प्लॉट्स या भागामध्ये वीजपुरवठा बंद राहणार आहे.

Loading

हे ही वाचा:  नाशिकमध्ये आज मध्यम तर मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group