या तारखेला होणार UPSC च्या पूर्व परीक्षा

प्रतिनिधी (नाशिक): पूर्व परीक्षेसोबत अन्य सर्व परीक्षांची घोषणा ही ३० दिवस आधी करण्यात येईल असे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून सांगण्यात आले होते. यंदा ही युपीएससी ची पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी होणार असल्याची घोषणा लोकसेवा आयोगाने केली आहे. यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अन्य सर्व परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षा, स्पर्धापरीक्षा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आल्या होत्या. यामध्ये शाळा, महाविद्यालये तसेच सरकारी पूर्व परीक्षांचा समावेश होता. लोकसेवा आयोगाने UPSC  ची पूर्व परीक्षा ३१ मे रोजी होणार असल्याचे सांगितले होते परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव बघता हि परीक्षा पुन्हा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ती परीक्षा आता ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.