एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना बेड्या, मुद्देमाल जप्त

नाशिक (प्रतिनिधी): एमडी ड्रग्ज विक्री करण्यास आलेल्या दोघांना अटक करण्यात आली आहे. संशयितांकडून ४० हजारांचे ड्रग्ज आणि पाच लाखांची कार असा पाच लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशपाक सलीम खान, शाहरुख युसूफ शेख अशी या ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट १ चे पथक अमरधामरोडवर गस्त घालत असताना पथकातील विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचला. यावेली अमरधामरोडवर शितळादेवी मंदिराजवळ संशयित कार (एमएच ०१ एजे ७९१७) थांबवली असता कारमधील दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर कारची झडती घेतली असता कारमध्ये २० ग्रॅम ड्रग्ज आढळले.