दुर्दैवी: पोहोण्यासाठी गेलेल्या सिडकोतील तीन युवकांचा बुडून मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): सिडको परिसरातील चार युवक वालदेवी डॅम बॅकवॉटर येथे शनिवारी दुपारी पोहोण्यासाठी गेले होते. त्यापैकी तिघांचा बुडून मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये एक युवक हा पोलीस कर्मचारी असल्याची माहिती मिळतेय. वैभव पवार पुण्यामध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता (राहणार उतम नगर श्रीराम चौक), मंगेश बागुल (राहणार पाथर्डी फाटा परिसर) हे मुंबई पोलीस कर्मचारी म्हणून काम करत होते, महेश लोळगे (राहणार महाकाली चौक पवन नगर) हा तरुण डाटा मॅटिक्स कंपनी मध्ये काम करत असल्याची माहिती मिळतेय. त्यांचे मृतदेह हे नाशिकच्या सिव्हील हॉस्पिटल मध्ये आणल्याचे कळते. अशी माहिती वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन येथून प्राप्त झाली आहे. त्यातील चौथा तरुण गणेश जाधव (राहणार उत्तम नगर बस स्टॉप मागील श्री राम चौक) मार्केटिंगचे काम करत होता. त्याला पोहता येत नसल्यामुळे तो पाण्यात उतरलेला नाही. तिघे तरुण बुडत असताना त्याने आरडाओरडा केला आणि त्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक तिथे जमा झाले पण दुर्दैवाने या तिघांना ते वाचू शकले नाही.