कोरोनाच्या सावटामुळे सोमेश्वर मंदिरात यंदाचा महाशिवरात्रोत्सव रद्द

NPA GOLD LOAN

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रोजच्या रोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.. याच पार्श्वभूमीवर श्री सोमेश्वर महादेव मंदिर संस्थानच्या वतीने यंदाचा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून विश्वस्त समितीच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गंगापूर रोड परिसरातील श्री सोमेश्वर महादेव मंदिरात शहरात जिल्ह्याभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी भाविकांच्या गर्दीमुळे जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. यंदा मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: शहरातील 'या' वाहतूक मार्गात महत्वाचे बदल !

मंदिर परिसरात गर्दी होऊ नये याच पार्श्वभूमीवर ११ मार्च रोजी होणारा महाशिवरात्री उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.. १० व ११ मार्च हे दोन दिवस मंदिर व परिसर भोवतालच्या परिसर सर्व भाविकांसाठी बंद राहणार आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनाचे पालन करत भाविकांनी मंदिर व परिसरात गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
Get Instant Updates