१५ ऑगस्ट नंतर शाळा सुरु करण्याचे संकेत

नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून कोरोन विषाणूचा प्रादुर्भा होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून शासनाने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अश्यात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणी दिली जात आहे. परंतु अनेक विद्यार्थ्यांचे नुकसानही होत आहे. म्हणून आता देशातील शाळा, महाविद्यालये ऑगस्ट महिन्यात सुरु करण्यात येतील असे संकेत केंद्रीय विकास मंत्री रमेश पोखरीयाल यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलतांना दिली.

१५ ऑगस्ट नंतर सर्व शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे संकेत त्यांनी दिले. सध्याच्या परिस्थितीत शाळा उघडणे शक्य नाही. परंतु यावर कोणतेही निर्णय घेण्यापूर्वी राज्यांशी यासंदर्भात चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे.