मंगळवार (७ जुलै) पासून ८ दिवस सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकची वाढती कोरोनाबाधीतांची संख्या बघता बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने मंगळवारपासून (दि.७ जुलै) सराफ बाजार आठ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही व्यापाऱ्यांनी रविवारपासूनच आपली दुकानं बंद ठेवायला सुरुवातही केली आहे. हा बंद १४ जुलैपर्यंत असणार आहे.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या