नाशिकमध्ये ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीत घट

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाकाळात ऑक्सिजन सिलिंडरची मागणी दररोज सुमारे २० हजारांपर्यंत पोहोचली होती. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र, मागील काही दिवसांपासून रुग्णांची संख्या घटत असल्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी कमी झाली असून प्रथमच या महिन्यात सिलिंडरच्या मागणीत २५ टक्के घट झाली आहे.

काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध खाटांपैकी ४० टक्के खाटादेखील रिक्त झाल्या आहेत.