नाशिक: स्विगी आणि झोमॅटोवरून या वेळेतच करता येईल फूड ऑर्डर

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात लागू केलेल्या निर्बंधांनंतर ऑनलाईन फूड डिलिव्हरीला परवानगी दिली होती.. मात्र बुधवारी (दि. १३ मे) दुपारी १२ नंतर फूड ऑर्डर करण्यात नागरिकांना अडचणी आल्या. याबाबत तपासणी केली असता स्विगी आणि झोमॅटो या दोन्ही अँप वरून सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ या वेळेतच ऑर्डर स्वीकारण्यात येतील असे लिहून आले. त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन काही मागवायचे असेल तर या वेळेतच मागवा आणि होणारी गैरसोय टाळा…