नाशिक शहरातील या भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा नाही..

नाशिक (प्रतिनिधी): पंचवटी जलशुद्धीकरण केंद्र येथील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी ऊर्ध्व वाहिनी दुरुस्तीमुळे प्रभाग १ व ६ मधील काही भागात गुरुवारी (दि. ११ फेब्रुवारी) दुपारी व सायंकाळी तर काही भागात सकाळी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

प्र. क्र. १ मधील शिवतेजनगर, श्रीधर कॉलनी, प्र. क्र. ६ मधील चांदशी रोड, गंगावाडी रोड, पिंगळेनगर, इरिगेशन कॉलनी, मानकरनगर, महालक्ष्मीनगर, विवेकानंदनगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, मेहेरधाम, गॅस गोदाम, यशोदानगर, पेठरोड परिसरात गुरुवारी (दि. ११) दुपारी व सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच..

प्रभाग क्र. १ मधील दुर्गानगर, शिवसमर्थनगर, जुईनगर, शिवतेजनगर, श्रीधर कॉलनी व प्रभाग क्र. ४ मधील कॅन्सर हॉस्पिटलमागील परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर व हमालवाडी परिसर तसेच प्रभाग क्र. ६ मधील मखमलाबाद, मातोश्रीनगर, विद्यानगर, वडजाईमातानगर, महादेव कॉलनी, घाडगेनगर, इरिगेशन कॉलनी परिसरात शुक्रवारी (दि. १२) सकाळी पाणीपुरवठा होणार नाही.