२५ जानेवारीपासून सुरु होणार नाशिक-बेळगाव विमानसेवा !

नाशिक (प्रतिनिधी): शहरातून हैदराबाद दिल्ली व अहमदाबाद या शहरांसाठी विमानसेवा सुरु झाली असून, यामुळे नाशिककरांना अवघ्या काही तासांमध्येच प्रवास करून हे शहरे गाठता येत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकरांसाठी आता परत बेळगावसाठी विमानसेवा सुरु झाल्याने याचा लाभ होणार आहे. नाशिकमधून बेळगावसाठी २५ जानेवारीपासून विमानसेवा सुरु होणार आहे.

स्टार एअर कंपनीकडून ही विमानसेवा दिली जाणार असून, आठवड्यातून ३ दिवस सोमवारी, शुक्रवारी आणि रविवारी ही सेवा देण्यात येणार आहे. यामुळे नाशिककरांना अवघ्या तासाभरात प्रवास करणे शक्य होणार आहे. नाशिक-बेळगाव या प्रवासासाठी १९९९ रुपये तिकीट दर आकारले जाणार आहे. तसेच नाशिकहून सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी फ्लाईट आहे. तर, स्टार एअर कंपनीकडून घोषणा करण्यात आली असून, या विमानसेवेमुळे कोल्हापूर तसेच गोवा ही शहरे देखील नाशिकशी कनेक्ट होतील.

म्हणून, या विमानसेवेमुळे विविध क्षेत्रांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. तसेच या कंपनीला २ वर्ष पूर्ण झाले असून, यामुळे कंपनीकडून सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार, सुरुवातीला २५ जानेवारीच्या आत प्रवास करणाऱ्यांना फक्त १२०२ रुपये तिकीट दारात प्रवास करता येणार आहे.