नाशिक (प्रतिनिधी): उत्तर भारतात सध्या बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिकमध्ये सोमवारी (दि.८ फेब्रुवारी) ९.२ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे. उत्तर भारतात पुढील ४ दिवस पश्चिमी प्रकोपामुळे पाऊस, बर्फवृष्टी, गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढेही पार २ ते ४ अंशाने घसरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
यंदा पश्चिमी चाक्र्वाताची संख्या सुमारे २५ पेक्षा अधिक झाल्याने थंडीमध्ये चढउतार होत आहेत. त्यामुळेच नाशिक शहरातही गेल्या दोन तीन दिवसांपासून थंडीचा तडाखा वाढला आहे.