नाशिक शहर व गुजरात राज्यातून मोटार सायकलची चोरी करणारा युवक गजाआड

नाशिक (प्रतिनिधी) :  नाशिक शहरात व गुजरात राज्यातून मोटार सायक ल चोरी करणाऱ्या युवकाला पेठ परिसरातील बोरवट फाट्या जवळ (दि.२६ मे २०२०) रोजी संशयित रमेश नामदेव राऊत (रा. बोरवट) यास त्याचेकडील युनीकॉन मोटारसाकलसह पोलिसांनी ताब्यात घेतले.

हा संशयित पेठ तालुक्यातील बोरवट फाट्या जवळ येणार आहे. अशी गुप्त माहिती गुन्हेशाखेच्या युनिट क्र.१ कडील पोलीस नाईक शांताराम यांना मिळाली होती.

त्यानंतर त्यांनी त्वरित पोलीस निरीक्षक वाघ यांना कळविली. व त्यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस  दिनेश खैरनार, पोलीस हवालदार प्रविन कोकाटे, अनिल दिघोळे, येवाजी महाले, संतोष कोरडे, पोलीस शिपाई सचिन अजबे, राहुल पालखेड, प्रवीण चव्हाण, गौरव खांडरे,पोलीस नाईक शांताराम महाले या सदर पथकाने बोरावट फाट्या जवळ सापळा लावून संशयिताला त्याच्याकडील  मोटार सायकल युनीकॉन सह ताब्यात घेतले. तेव्हा मोटारसायकल विषयी विचारपूस केली असता, सुरुवातीला संशयितानी उडवाउडवीचे उत्तरे दिली.

नंतर त्यास आणखी विश्वासात घेऊन विचारले असता, त्याने सदर  मोटारसायकल ही गुजरात राज्यातील राहेर, कारपाडा, गुजरात येथून चोरल्याचे सांगितले. तसेच त्याच्याकडे नाशिक शहरातून चोरी केलेली मोटार सायकल ही ८ महिन्यांपूर्वी म्हसरूळ परिसरा तील एक पल्सर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. या प्रकरणी संशयिताला म्हसरुळ पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आली आहे.

पोलिस कस्टडी रिमांड मध्ये सखोल तपास करता, संशयितांनी सुमारे दीड वर्षापूर्वी धरमपुर येथून पल्सर मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. संशयितानी आता पर्यंत नाशिक शहरातील १, गुजरात राज्यातील २ असे ३ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.  या प्रकरणी पुढील तपास, गुन्हेशाखा युनिट क्र १ पोलिस नाईक शांताराम महाले, करीत आहेत.