पंचवटीतील दोघे सराईत ‘एमपीडीए’ अन्वये स्थानबद्ध

नाशिक (विशेष प्रतिनिधी): शहरात लुटमार तसेच मारहाण करत दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार विकी उर्फ काळ्या कोयत्या बाळु जाधव (वय २०, रा. शनी मंदिराजवळ, पेठरोड, पंचवटी), दिग्या उर्फ दिंगबर किशोर वाघ (वय २२, रा. शिंपीबाईची चाळ, नवनाथनगर, पंचवटी) यांना शहर पोलिसांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केले आहे. दोघांची रवानगी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. 

दोघांविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात खुन, दरोडा, जबरी चोरी, दंगा करणे, प्राणघातक शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.