आजपर्यंत नाशिक जिल्ह्यात 134 पॉझिटिव्ह ; दोन रुग्ण कोरोना मुक्त

नाशिक (प्रतिनिधी) : आज 24 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना साथरोग बाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त झाला असून त्यात आजपर्यंत जिल्ह्यातील 722 संसर्गितांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 134 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज अखेर 200 संशयितांचे अहवाल प्रलंबित असून जिल्ह्यातून दोन रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 11 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे.

सद्यस्थितीत नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 11 रुग्ण कोरोना संक्रमित असून त्यातील 01 रुग्ण पूर्णपणे बरा होऊन कोरोना मुक्त झाला आहे. नाशिक ग्रामीण भागातून 05 रुग्ण कोरोना बाधित असून त्यातील एक रुग्ण पूर्णतः बरा होऊन कोरोना मुक्त झाला आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 118 कोरोना संक्रमित असून त्यातील 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 134 कोरोना बाधित रुग्ण आहेत.

ज्या परिसरात  नव्याने  कोविड-19  चे  पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येतील,  त्या भागात काही  प्रमाणात सुरू करण्यात आलेल्या अत्यावश्यक सेवा तात्काळ बंद करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कळविले आहे.

 (टीप: सदरची आकडेवारी ही 24 एप्रिल 2020 रोजी सायंकाळी 7.00 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय, नाशिक यांच्या कडून प्राप्त अहवालानुसार आहे.)