नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. ३० जून) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी १३२ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ७८, नाशिक ग्रामीण: ५१, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात गेल्या ४८ तासांत एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ४, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: १ असा समावेश आहे. तर जिल्ह्यात बुधवारी एकूण ११८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.