नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. २९ मे) इतके कोरोना पॉझिटीव्ह; ४८ मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी ८५८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ३४१, नाशिक ग्रामीण: ४७५, मालेगाव: २२, जिल्हा बाह्य: २० असा समावेश आहे. जिल्ह्यात शनिवारी कोरोनामुळे ४८ जणांचा मृत्यू झाला. यात, नाशिक शहर: १७, मालेगाव: ८, नाशिक ग्रामीण: २३ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण २३०२ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.