नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २३ जुलै) कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २३ जुलै) कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी (दि. २३ जुलै) एकूण ४९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: २० नाशिक ग्रामीण: २६, मालेगाव: १ तर जिल्हा बाह्य: २ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: १ तर नाशिक ग्रामीण: २ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी एकूण १०८ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आणि निर्बंधांबाबत आढावा बैठक पार पडली. त्याप्रमाणे नाशिकमध्ये सध्यातरी निर्बंधांमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाही. शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन सध्या तरी कायम असणार आहे. याची व्यापारी बांधवांनीसुद्धा नोंद घ्यावी.
या Bluetooth Headphone ने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे… तब्बल दोन लाख लोकांनी आतापर्यंत खरेदी केला हा Bluetooth Headphone.. तुम्ही खरेदी केला का ?