नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर.. पुन्हा रुग्णसंख्या वाढली ! 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू !

नाशिक जिल्ह्यात कोरोनाने कहर केला आहे. बुधवारी (दि. १७ मार्च) पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे.

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात बुधवारी (दि. १७ मार्च) तब्बल २१४६ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: १२९६, नाशिक ग्रामीण: ६३१, मालेगाव: १७४ आणि जिल्हा बाह्य ४५ रुग्णांचा समावेश आहे. तर जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: ३, मालेगाव: १, नाशिक ग्रामीण: ४ तर जिल्हा बाह्य मध्ये १ असा समावेश आहे.

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जेलरोड,नाशिक येथील ३८ वर्षीय महिला, २) जेलरोड,नाशिक येथील ८३ वर्षीय वृद्ध पुरुष, ३) घ.न.२२८२,पंचभाई वाडा, गणेश टेक, जुने नाशिक येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष यांचा समावेश आहे.