नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ११ जुलै २०२१) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. ११ जुलै २०२१) १८८ इतके कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात नाशिक शहर: ७९, नाशिक ग्रामीण: ९७, मालेगाव: ५ तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहर: २ तर नाशिक ग्रामीण: ५ असा समावेश आहे. त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यात रविवारी एकूण १११ कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. नाशिक जिल्ह्याचे कोरोना रुग्णांचे आकडे जरी कमी होत असले तरीही एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, की कोरोना अजूनही गेलेला नाही. त्यामुळे त्यादृष्टीने शासनाने सांगितलेले प्राथमिक नियम अजूनही प्रत्येक नागरिकाने पाळणे गरजेचे आहे.