
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात गुरुवारी एकूण ३०७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये नाशिक शहर: ९७, नाशिक ग्रामीण: २००, मालेगाव: ३ तर जिल्हा बाह्य: ७ असा समावेश आहे. तर आज दि. १० जून २०२१ रोजी पोर्टलवर अपडेट झालेले एकूण मृत्यू २७० आहेत. या निमित्ताने कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीतील लपवाछपवी उघड झाली आहे. कोरोनामुळे झालेल्या मृत्युंमध्ये नाशिक शहर: १६७, नाशिक ग्रामीण: ९१, मालेगाव: २ तर जिल्हा बाह्य: १० असा समावेश आहे. तर जिल्ह्यात गुरुवारी एकूण १२० कोरोना रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत..