जिल्ह्यात आजपर्यंत ३७ हजार ०७७ रुग्ण कोरोनामुक्त; ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात कोरोनारुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८०.०४ टक्के !

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३७ हजार ०७७ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ८ हजार २७५ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ४१०, चांदवड १०७, सिन्नर ४१५, दिंडोरी ८७, निफाड ५९७, देवळा ७५,  नांदगांव ३३६, येवला ९९, त्र्यंबकेश्वर ५४, सुरगाणा ०२, पेठ १०, कळवण २५,  बागलाण २८१, इगतपुरी ९०, मालेगांव ग्रामीण ३२७ असे एकूण २ हजार ९१५  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ७१७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६२८  तर जिल्ह्याबाहेरील १५ असे एकूण ८ हजार २७५  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ४६  हजार ३२५  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७१.४९,  टक्के, नाशिक शहरात ८३.५१ टक्के, मालेगाव मध्ये  ७४.६२  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.१५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८०.०४ इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २८२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ५४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११९ व जिल्हा बाहेरील २४ अशा एकूण ९७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

(वरील आकडेवारी आज दि. ९ सप्टेंबर २०२० सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)