जिल्ह्यात आजपर्यंत ३० हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त; ७ हजार १३८ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३० हजार १५९  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ७ हजार १३८ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ८७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ३५०, चांदवड ५५, सिन्नर ३६८, दिंडोरी ५३, निफाड ३८६, देवळा ६९,  नांदगांव २४७, येवला ७७, त्र्यंबकेश्वर १९, सुरगाणा ०६, पेठ ०८, कळवण १०,  बागलाण २१०, इगतपुरी ६६, मालेगांव ग्रामीण २९० असे एकूण २ हजार २१४  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ३०३, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६१२  तर जिल्ह्याबाहेरील ०९ असे एकूण ७ हजार १३८  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ३८  हजार १७४  रुग्ण आढळून आले आहेत.

हे ही वाचा:  जलसमृद्ध नाशिक अभियानाचा शुभारंभ; विविध संस्थांची साथ

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७३.४९,  टक्के, नाशिक शहरात ८१.६० टक्के, मालेगाव मध्ये  ७२.१३  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.४५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७९.०० इतके आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २४६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ४९६, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ११२ व जिल्हा बाहेरील २३ अशा एकूण ८७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिकला हंगामातील उच्चांकी ४०.४ तापमान; देवळा, सुरगाणा, हरसूलला अवकाळी पाऊस

(वरील आकडेवारी आज दि. २ सप्टेंबर) सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790