BREAKING NEWS: नाशिक जिल्ह्यात 4 नविन कोरोना पॉझिटिव्ह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात आज (दि.24 एप्रिल 2020) सायंकाळी आलेल्या अहवालात 4 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात हिम्मत नगर, मालेगावचे 2 पुरुष (एक 32 वर्षीय व एक 27 वर्षीय), येवल्याची 1 महिला (48 वर्षीय) आहे. हे रुग्ण नाशिक जिल्हा रुग्णालयातदाखल आहेत. तर अजून एक रुग्ण मानखुर्द मुंबईयेथून भंडारा जिल्ह्यात आपल्या अन्य सहकारी यांच्या सोबत जात असताना 22 एप्रिल रोजी त्यास नाशिक रोड पोलिसांनी पकडले होते. त्याच्यासोबत तब्बल अकरा जण होते. पोलिसांनी पकडून त्यांना कठडा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केल्यानंतर त्यांचे नमुने घेण्यात आले. त्यातील एक कोरोना बाधित आला आहे. त्याच्या सोबत असलेले 11 जण आधीच रुग्णालयात दाखल असल्यामुळे चिंतेचे कारण नाही अशी माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ शेटे यांनी दिली आहे.