रिवार्ड जमा होईल असे आमिष दाखवून हजारो रुपयांचा गंडा

नाशिक (प्रतिनिधी): फोन द्वारे संपर्क करून क्रेडिट कार्ड बंद केल्यावर रिवार्ड पॉइंट जमा होतील असे आमिष दाखऊन एका इसमाच्या खात्यावरील रक्कम फसवणुकीने  लुटण्याचा प्रकार मंगळवारी दि. 2 जून 2020 रोजी नाशिकरोड येथे घडला. या प्रकरणी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यात आली आहे.

वृंदावन निवृत्ती गीते,( वय ३० रा. आशापुरा सोसायटी, सिन्नर फाटा, चेहडी शिव, नाशिक रोड) असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव असून, संशयित व्यक्तीने, वृंदावन निवृत्ती गीते यांना  क्रेडिट कार्ड बंद केल्यावर रिवार्ड जमा होतील असा फोन केला. व क्रेडिट कार्ड विषयी संपूर्ण गोपनीय माहिती घेऊन दोन्ही कार्ड वरून फसवणुकीने एकूण ६०००० रुपये चे व्यवहार केले. या प्रकरणी संशयित मोबाईल धारक व पीडित व्यक्तीचा खात्यावरील रक्कम वर्ग झालेल्या खातेधारकांविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. या संदर्भात पुढील तपास पोलीस निरीक्षक देवराज बोरसे करत आहेत.