जिल्ह्यात आजपर्यंत ५६ हजार ५८९ रुग्ण कोरोनामुक्त ; ८ हजार ४२३ रुग्णांवर उपचार सुरू…

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.२३) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ५६  हजार ५८९ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ८ हजार ४२३  रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ८४९  ने घट झाली आहे.  आत्तापर्यंत १ हजार २०५  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ३७४, चांदवड १३२ , सिन्नर ४१५, दिंडोरी १४४, निफाड ८२४, देवळा ३४,  नांदगांव २०१, येवला ६०, त्र्यंबकेश्वर ४७, सुरगाणा २२, पेठ १७, कळवण ७९,  बागलाण १६०, इगतपुरी २९३, मालेगांव ग्रामीण २८२ असे एकूण ३ हजार ८४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ६८०, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५६१  तर जिल्ह्याबाहेरील ९८ असे एकूण ८ हजार ४२३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ६६  हजार २१७  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी :

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७९.७५,  टक्के, नाशिक शहरात ८८.२१ टक्के, मालेगाव मध्ये  ७९.५१  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६८.७५  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमा ८५.४६ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ३६६, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ६६२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १५०  व जिल्हा बाहेरील २७ अशा एकूण १ हजार २०५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी आज (दि.२३) सकाळी ११.०० वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)