महापालिकेने नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत त्या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. आतापर्यंत १५० प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रसार अधिक वाढू नये आणि त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून महानगरपालिकेने या प्रतिबंधित क्षेत्रात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. सदर परिसरातील कोणताही व्यक्ती आजारी असतील तर त्यांची माहिती घेऊन मनपाच्या वैद्यकीय विभागाच्या माध्यमातून त्याची पुढील तपासणी करण्याचेही आदेश महानगरपालिकेकडून देण्यात आले आहेत.

तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येत असून यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरेपालिकेच्या वतीने करण्यात आले.