ट्रॅव्हल हिस्ट्री किंवा लक्षणं लपवू नका

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नुकताच एक व्हिडिओ जारी केला आहे. लॉकडाऊन नंतरही अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने नाशिक मध्ये आल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अशा लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना दिल्या आहेत. यातील जे लोक कोरोनाबाधित क्षेत्रातून आले असतील त्यांनी ताबडतोब आरोग्य प्रशासनाला याबाबत कळविणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कुठे सामुहिक पद्धतीने आयोजित धार्मिक कार्यक्रमाला कुणी उपस्थिती लावली असेल, त्यांनीही ही माहिती कळवायला हवी असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हंटले आहे. बघा संपूर्ण व्हिडिओ…