नाशिक शहरात मंगळवारी (दि. 8 सप्टेंबर) 1134 कोरोना पॉझिटिव्ह; 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. ८ सप्टेंबर) धक्कादायक अहवाल हाती आले आहेत. मंगळवारी तब्बल ११३४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १७९४, एकूण कोरोना  रुग्ण:-३१,९२१, एकूण मृत्यू:-५४८ (आजचे मृत्यू १०), घरी सोडलेले रुग्ण :- २६,६५६, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४७१७ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) मुक्तानंद शाळेजवळ, राणाप्रताप चौक, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. २) ८, भारत सोसायटी, जुना आडगाव नाका येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) बंगला क्र  ७,ग्रीन लॉन, शिंगाडा तलाव, नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४)व्होकार्ड  हॉस्पिटल,वाणी हाऊस, वडाळा नाका, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) साईनाथ नगर, अमृत वर्षा कॉलनी, वडाळा रोड,नाशिक येथील ५२ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे. ६) घर नंबर १२६, बंगरवाडी, गंगापूर नाका, नाशिक येथील ५५ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेले आहे. ७) कानडे मारूती लेन, नाशिक येथील ५७ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ८) गायकर मळा, भाटिया कॉलेज, नाशिक येथील ६४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ९) मोतीवाला होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, ध्रुवनगर,सातपूर कॉलनी, नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. १०) पाथर्डी फाटा, नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.