नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) २७१ कोरोना पॉझिटिव्ह; ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरात शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) २७१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ८९५, एकूण कोरोना रुग्ण:-६०,६०४, एकूण मृत्यू:-८५० (आजचे मृत्यू ०३), घरी सोडलेले रुग्ण :-५६,५७०, उपचार घेत असलेले रुग्ण:- ३१८४ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय माहिती डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) प्लॉट क्रमांक ४४,योगेश्वर निवास, इंद्रप्रस्थ कॉलनी, महाजन नगर, नाशिक येथील ७१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) नाशिकरोड,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) सुखदा अपार्टमेंट, रूम क्रमांक ६, डीजीपी नगर -२, अंबड,नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.