नाशिकमध्ये 5 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण !

नाशिक(प्रतिनिधी): शहरात शनिवारी (दि. २३ मे २०२०) सायंकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण पाच नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर सहाव्या रुग्णाचा मृत्यूपश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मृत पावलेला सदर रुग्ण समता नगर (टाकळी) येथील आहे. नवीन पाच रुग्णांपैकी चार रुग्ण नाईकवाडीपुरा (नाशिक) येथील आहेत तर एक वडाळा पाथर्डी रोड येथील आहे.

नवीन पाच रुग्णांमध्ये नाईकवाडीपुरा (जुने नाशिक) येथील २९ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, २१ वर्षीय महिला, ७८ वर्षीय महिला आणि वडाळा पाथर्डी रोड येथील १७ वर्षीय युवक यांचा समावेश आहे.

मृत पावलेल्या रुग्णाची वेगळी सविस्तर बातमी आम्ही टाकत आहोत.