नाशिक शहरात सोमवारी (दि. 21 सप्टेंबर) 595 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात सोमवारी (दि. २१ सप्टेंबर) ५९५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २१३५, एकूण कोरोना  रुग्ण:-४४,४०६, एकूण मृत्यू:-६५० (आजचे मृत्यू ०८), घरी सोडलेले रुग्ण :- ३८,६५८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ५०९८ अशी संख्या झाली आहे.

नाशिक जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा..

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) जेलरोड,नाशिकरोड येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) युनियन बँक, रुपाश्री अपार्टमेंट, दिंडोरी नाका, नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे. ३) आकांक्षा पार्क, हिरावाडी, विजय नगर, नाशिक येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) साई वाटिका, रोहाऊस क्रमांक १२, रघु पुण्य निवास, जगताप नगर, सिडको कॉलनी, उंटवाडी येथील ७६ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) जेलरोड नाशिक रोड,नाशिक येथील ७४ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) घर नंबर ६६ राजीव नगर, नाशिक येथील ६५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.७)श्री.रानदेव कृपा, प्लॉट क्रमांक ०७,सर्व्हे क्रमांक ९८८/४/१ रामा हाईट, सिडको येथील ६१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.८) वडाळा गाव, नाशिक येथील ५६ वर्षीय महिलेचे निधन झालेले आहे.