नाशिक शहरात रविवारी (दि. 19 जुलै) 278 कोरोनाबाधित रुग्ण; 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात रविवारी (दि. १९ जुलै) २७८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २६४ एकूण कोरोना रुग्ण:-५७२२ एकूण मृत्यू:-२०५ (आजचे मृत्यू ०३)  घरी सोडलेले रुग्ण :- ३७९२ उपचार घेत असलेले रुग्ण:- १७२५ अशी संख्या झाली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) दिंडोरी रोड, नाशिक येथील पंचवटी येथील ५५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २) सावित्रीबाई फुले नगर, वडाळागाव, नाशिक येथील ६० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. ३)वडाळारोड पेट्रोल पंपासमोर, भारत नगर येथील ४३ वर्षीय पुरुष व्यक्तीचा मृत्यू झालेले आहे.