नाशिक शहरात मंगळवारी (दि. 14 जुलै) 136 कोरोनाबाधितांची नोंद; 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): शहरात मंगळवारी (दि.१४ जुलै) रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण १३६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र -३००, एकूण कोरोना रुग्ण:-४३७८, एकूण मृत्यू:-१८१ ,घरी सोडलेले रुग्ण :- २७९७ उपचार घेत असलेले रुग्ण:- १४०० अशी संख्या झाली आहे.

मंगळवारी आढळून आलेल्या कोरोनाबाधितांची परिसरनिहाय यादी प्राप्त इथे क्लिक करून डाउनलोड करा. (टीप:-रुग्ण १६८ सदरची आकडेवारी २४ तासाची आहे)

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची माहिती: १) म्हसोबा नगर, पेठरोड, पंचवटी येथे ७८ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) पाटील नगर, नाशिक येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) शिवाजी चौक,जुने नाशिक येथील ७२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) नारायण बापू नगर,जुना सायखेडा रोड,नाशिकरोड येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) चेहडी, नाशिकरोड येथील ४० वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ६) गुरुदत्त कॉलनी, जेलरोड, नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.