नाशिक शहरात मंगळवारी (दि. 1 सप्टेंबर) 626 कोरोना पॉझिटिव्ह; 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) ६२६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता आत्ता पर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – १२५७, एकूण कोरोना  रुग्ण:-२६,०७७, एकूण मृत्यू:-४९६, (आजचे मृत्यू ०५) घरी सोडलेले रुग्ण :- २१,२७८, उपचार घेत असलेले रुग्ण:- ४३०३ अशी संख्या झाली आहे.

मंगळवारी नाशिक शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची परिसरनिहाय यादी डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची माहिती: १) राज राजेश्वरी,राधेश्याम हाऊस,हरिकुंज नगर येथील ७५ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. २) सिडको नाशिक येथील ६५ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेले आहे. ३) कुलस्वामिनी प्रोव्हिजन, महावीर रो हाऊस,सात माऊली चौक, श्रमिक नगर सातपूर येथील ६३ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ४) औदुंबर निवास, वनविहार कॉलनी, मातोश्री स्वीट, सातपूर येथील ८१ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. ५) महात्मा नगर, नाशिक येथील ४८ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.