नाशिक शहरात बुधवारी ११ पॉझिटिव्ह रुग्ण; जाणून घ्या त्यांची हिस्ट्री

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात आज दिवसभरात ११ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात दिपाली नगर (सिडको)-१, पोलीस हेडक्वार्टर (नाशिक)-१, राहुल वाडी(पंचवटी)-१, भाजी मार्केट (पंचवटी)-२, दत्त मंदिर नाशिकरोड-२ यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे सर्दी-पडशाचा त्रास होत असल्याने तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या ४ रुग्णांचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवीला असता त्या चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यात आयटी पार्क वडाळा येथील ३८ वर्षीय रहिवासी, रासबिहारी हायस्कूल जवळील रहिवाशी ४७ वर्षीय महिला, वडाळा येथील ४८ वर्षीय महिला, पंचवटीतील दिंडोरी नाका परिसरातील ७० वर्षीय पुरुष यांचा यामध्ये समावेश आहे.

काही रुग्णांची हिस्ट्री:

रामनगर येथील मृ त पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या राहुल वाडी  येथील २१ वर्षीय युवकाचा  अहवाल पॉझिटिव्ह आला असून  त्याला डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंचवटी महालक्ष्मी टॉकीज येथील रुग्णाच्या संपर्कातील २७ वर्षीय युवक व ४० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दत्त मंदिर नाशिक रोड परिसरातील रहिवाशी १७ वर्षीय युवती व ३६ वर्षीय महिला हे मुंबईहून आले असून त्यांचे नमुने तपासणी केली असता ते कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दिपाली नगर येथील  रहिवाशी ३२ वर्षीय पी.पी किट  विक्रीचा व्यवसाय असून त्यांचे मुंबई -ठाणे या भागात नियमित जाणे-येणे होते त्यांचे घशाचे नमुने तपासणी केला असता त्याचा  कोरोना बाधीत असल्याचा  अहवाल प्राप्त झाला असून त्यांना डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.