नाशिकमध्ये सोमवारपासून ‘या’ वेळेत संचारबंदी ! मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्याने चिंताही वाढवली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी आणि कोरोना रुग्णांच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी नाशिकमध्ये सोमवारपासून (दि. २२ फेब्रुवारी) रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तसेच मास्क न घातल्यास १ हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. अशी माहीती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.