जुन्या नाशकात ‘मालेगाव पॅटर्न’ तपासणी शिबीर

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे मालेगावच्या डॉक्टरांनी यावर पुढाकार घेऊन नाशिक शहरात तपासणी सुरु केली आहे. नाशिकमधील जुने नाशिक परिसरातील बडी दर्गा ट्रस्टतर्फे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आला आहे. या शिबिरामध्ये मालेगावच्या डॉक्टरांकडून तपासणी केली जात आहे. आतापर्यंत पाच हजारांहून अधिक रुग्णांवर तपासणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वडाळा गावातही न्यू उम्मीद या संस्थेकडून तपासणी करण्यात येत आहे.