नाशिकमध्ये अशा ठिकाणी करण्यात येणार कठोर लॉक डाऊन!

नाशिक (प्रतिनिधी) : पालकमंत्री छगन भुजबळ यांनी काल (दि.१०) जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळून येतील अशा भागांमध्ये कठोर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

नाशिकमध्ये कोरोनाबाधीतांची वाढत चाललेली संख्या बघून सगळ्यांचेच डोळे पांढरे झाले आहेत. त्यातच शहरातील अनेक भागांमध्ये एकाच वेळी मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येण्यास आता सुरुवात झालीये. म्हणून पालकमंत्र्यांनी या वाढत्या रुग्णसंख्येवर अटकाव आणण्याच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेतलाय. यापुढे ज्या ज्या भागांमध्ये कोरोनाचे अधिक रुग्ण सापडतील ते भाग लॉक डाऊन करण्यात येतील असा निर्णय या बैठकीत झाला.