नाशिक शहर: रात्री उशिरा अजून 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; दिवसभरात 21 रुग्णांची नोंद !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मंगळवारी (दि. २ जून २०२०) रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार नव्याने १३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात सातपूर राजवाडा (आंबेडकर चौक)-१, इच्छामणी नगर (नाशिकरोड)-१, दोंदे मळा (पाथर्डी फाटा)-१, गोसावी वाडी (नाशिकरोड)-२, पेठ रोड -३, एमएचबी हॉस्पीटल (पंचवटी)-२, कला नगर (दिंडोरी रोड)-१, समता नगर (टाकळी)-१, वीर सावरकर नगर(सिडको)-१ यांचा समावेश आहे.

म्हणजेच सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये एकूण आठ आणि रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये १३ असे मंगळवारी दिवसभरात एकूण २१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

Loading

हे ही वाचा:  नाशिक: लूटमार करणारे अवघ्या काही तासात जेरबंद!

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790