नाशिक शहरात २७ जुलैपर्यंत जमावबंदी आदेश लागू… हे आहेत नियम…
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत…
शहरात सातत्याने सुरू असलेली आंदोलने, येणाऱ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिस आयुक्तालयाने दिनांक १३ जूलै ते २७ जूलैपर्यंत जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत.
शहरात सातत्याने सुरू असलेली आंदोलने, येणाऱ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर देशात कुठेही जातीय घटना घडत असल्यास अशा घटनेच्या तीव्र प्रतिक्रिया पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात उमटण्याची शक्यता असते…
त्यामुळे हे आदेश जारी करण्यात आले आहेत…
- नाशिक: सिटी सेंटर मॉल जवळ रस्ता खचल्याने एकेरी वाहतूक
- Breaking: सप्तश्रुंगी देवी मंदिर पुढील दीड महिना बंद राहणार, मंदिर ट्रस्टचा निर्णय
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी हे आदेश जारी केले आहेत…
महाराष्ट्र पोलिस कायदा सन १९५१ चे कलम ३७ (१) (३) च्या कलमाद्वारे जारी करण्यात आलेल्या आदेशात कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड, अथवा शस्त्रे बरोबर नेणे, शस्त्रे , सोटे, भाले, तलवारी, काठ्या,बंदुका आदी वस्तू बरोबर नेणे, प्रतिकात्मक दहन करणे, अर्वाच्य घोषणा देणे, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन महाआरती करणे, सभा,मिरवणुका आदी प्रकारांने शांतता भंग होणाऱ्या सर्व प्रकारांना मनाई करण्यात आली आहे.
मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, वाद्य वाजविणे इत्यादी…ज्यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहोचेल किंवा राज्याची सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल, अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे, या कृत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमून महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून शहरात फिरणे, पेढे वाटणे, फटके वाजविणे, घंटानाद करणे, धार्मिक तेढ निर्माण करणारी शेरेबाजी करणे,
महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) पाच किंवा पाच शिवाय सभा घेनेस किंवा मिरवणूक काढणेस बंदी घालण्यात आली आहे.
वरील पूर्ण आदेश हा शासनातील सेवेतील व्यक्तीना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.
जमावबंदीचे आदेश लग्नकार्य, धार्मिक विधी, प्रेतयात्रा, सिनेमागृह यांना लागू राहणार नाहीत..