शहराच्या काही भागातील प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध हटविले; १४ दिवसांचा कालावधी पूर्ण

नाशिक(प्रतिनिधी): शहरात ज्या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येतो ते क्षेत्र हे पुढच्या चौदा दिवसांसाठी प्रतिबंधित करण्यात येतं. जेणेकरून हा आजार त्या परिसरात पसरू नये हा त्यामागचा उद्देश असतो. गेल्या काही दिवसांपूर्वी सातपूरचे संजीवनगर, किशोर सूर्यवंशी मार्ग(दिंडोरी रोड) येथील वृंदावन नगर तसेच नाशिकरोड येथील धोंगडे मळा या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे हे क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आले होते. आता चौदा दिवसांचा कालावधी संपल्याने या भागांमधील निर्बंध हटविण्यात आले आहेत.