नाशिक शहरात शुक्रवारी (दि.19 जून) नव्याने २८ कोरोनाबाधित; दिवसभरात 63 रुग्णांची नोंद !

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शुक्रवारी (दि. १९ जून २०२०) रात्री ९.२५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात नव्याने २८ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. याआधी दिवसभरात ३५ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता दिवसभरातल्या रुग्णांची संख्या एकूण ६३ झाली आहे.

शुक्रवारी रात्री ९.२५ वाजता प्राप्त झालेल्या अहवालात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये: मातोश्री नगर-२, हिरावाडी-१, उपनगर—२, गंजमाळ-२, महाराणा प्रताप चौक-१, पखाल रोड (अशोक मार्ग)-१, वैशाली नगर (फुले नगर)-१५, औरंगाबाद रोड-१, मेहेबुब नगर (वडाळा गाव)-१, भराड वाडी (फुले नगर)-१, भाभा नगर-१ अशा एकूण २८ रुग्णांची नोंद झाली आहे.