धक्कादायक: नाशिक शहरात शनिवारी (दि.6 जून) चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात शनिवारी (दि. ६ जून) 4 कोरोनाबाधीतांचा उपचार घेत असतांना मृत्यू झाला आहे. नाशिक शहरासाठी ही अतिशय धक्कादायक बाब आहे. अशातच सम-विषम याप्रमाणे दुकाने उघडण्यास मुभा देण्यात आली होती, मात्र शनिवारी सरसकट सर्व दुकाने उघडी असल्याचे दिसले. त्यामुळे आता प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. सोशल डिस्टंसिन्ग आणि इतर नियम मोडणाऱ्या लोकांवर कारवाई होतच नसेल तर बाजारपेठेतील गर्दी अशीच वाढत राहील आणि कोरोनाबाधीतांचे आकडेही !

नव्याने आलेल्या काही कोरोनाबाधीतांची हिस्ट्री आणि मृत्यू झालेल्यांची माहिती

खतीब बंगलो,नाशिक येथील ६२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सरदार चौक,भोरे सदन येथील ४९ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.मार्केट यार्डात त्यांचा व्यवसाय आहे.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सह्याद्री नगर,पंपिंग रोड येथील ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

प्लॉट क्रमांक ६, दीपज्योती अपार्टमेंट,ठाकरे बंगला येथील ८३ वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे.

प्लॉट क्रमांक ८,सुप्रभात, रोहिणी नगर  येथील ३४ वर्षीय पुरुषाचा अहवाल  पॉझिटीव्ह आलेला आहे.

पंचवटी टॉवर,रूम नंबर ३३ येथील ३६ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.

नाईकवाडी पुरा अजमेरी मजीद,येथील ५० वर्षीय महिलेचे शनिवारी दि.०६/०६/२०२० रोजी मृत्यू झाला आहे.

अमन हाऊस मागील सुमन चंद्र बिल्डिंग,पखाल रोड,अशोका मार्ग येथील येथील ४१ वर्षीय व्यक्तीचा शनिवारी दि.०६/०६/२०२० रोजी मृत्यू झाला आहे.

गंजमाळ येथील ४४ वर्षीय व्यक्तीचे शनिवारी दि ०६/०६/२०२० रोजी मृत्यू झाला आहे.

खोडे नगर,वडाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचे शनिवारी दि.०६/०६/२०२० रोजी मृत्यू झाला आहे.